आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 1 Infected With Kovid, 70 Employees, All Other Wards Of The Hospital Closed Due To Kovid Patients; Municipality's Dr. Hussain Hospital In A Strange Way| Marathi News

दिव्य मराठी एक्स्पोज:कोविडग्रस्त 1 , दिमतीस कर्मचारी 70, रुग्णालयाचे इतर सर्व वाॅर्ड काेविड रुग्णामुळे बंद; मनपाच्या डाॅ. हुसेन रुग्णालयात अजब प्रकार

जहीर शेख | नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन महिन्यात कोरोनाचे किरकोळ स्वरूपात रुग्ण सापडताच दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील सर्व वॉर्ड पुन्हा बंद करण्यात आले. विशेष म्हणजे, सध्या या १६० खाटांच्या रुग्णालयात केवळ काेविडचा १ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असून त्यासाठी ८ मेडिकल ऑफिसर,१ चिफ मेडिकल ऑफिसरसह ७० कर्मचाऱ्यांचा स्टाफ तैनात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

डॉ. हुसेन रुग्णालयात चक्क दोन महिन्यापासून केवळ एक-दोन रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे दाखवले जात आहे. रुग्णालयातील प्रसूतिगृह बंद असल्याने प्रसूतीला आलेल्या महिलांचे प्रचंड हाल होत आहे. कोरोना काळात या रुग्णालयातील वॉर्ड बंद ठेवले आहेत. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर महापालिकेचे मुख्य कोविड रुग्णालय असलेल्या या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचा वापर पुन्हा सर्व रुग्णांसाठी करण्यात यावा, तसेच, या रुग्णालयांत प्रसूतिगृह पुन्हा सुरू करण्याची मागणीही हाेत आहे. मात्र, याकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.

या रुग्णालयात कोरोनाच्या आधी एका दिवसात दहाहून अधिक प्रसूती होत होत्या. यात सिझरचाही समावेश होता. मात्र, कोरोनाच्या काळात हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केल्याने या रुग्णालयातील सर्व वाॅर्ड बंद करण्यात आले. यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल हाेत आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा प्रसूती विभाग सुरू करण्यात आला होता. मात्र, मागील महिन्यात काेराेनाचे रुग्ण आढळल्यानंतर या रुग्णालयात इतर रुग्णांना येथे मनाई करण्यात आली.

दररोज व्हायच्या १५ प्रसूती, त्यात निम्मे सिझर
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात एका महिन्यात ४५० हुन अधिक प्रसूती म्हणजे दररोज साधारण १५ प्रसूती व्हायच्या मात्र, कोरोना आल्यापासून या रुग्णालयातील प्रसूतिगृह बंद करण्यात आले. त्यामुळे जुने नाशिकसह वडाळागाव, गंजमाळ, भारतनगर, द्वारका भागातील गोरगरीब महिलांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे.

१० वॉर्ड, ऑपरेशन थिएटर ६ महिन्यांपासून बंद
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील सी-३ ह‍ा कोविड वॉर्ड वगळता सर्व १० वॉर्ड व ऑपरेशन थिएटर मागील सहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे. याठिकाणी इतर कोणत्याही रुग्णावर उपचार केला जात नसल्याने डॉक्टरही केवळ सह्यांसाठीच रुग्णालयात येत असल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...