आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाख 93 हजारांचा ऑनलाइन गंडा:महाराष्ट्र पोलिस अकादमी प्रशासकीय कर्मचाऱ्याची फसवणूक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाईन कर्ज घेणे एका शासकीय कर्मचाऱ्याला महागात पडले आणि मनस्ताप ही झाला. सायबर हॅकरने रिझर्व बँकेची बनावट नोटीस पाठवत एका वित्त कंपनीचे कर्ज मंजुर करण्याचे आमिष देत विविध प्रकारच्या क्युरी असल्याचे सांगत 1 लाख 93 हजारांना ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार महाराष्ट्र पोलिस अकादमी मध्ये उघडकीस आला. गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि रविंद्र साळवे रा. एमएपीए यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मे महिन्यात अनोळखी नंबरहून फोन आला. टाटा कॅपिटल लिमिटेड मुंबई येथून बोलत असल्याचे सांगत कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्र स्टॅम्प पेपर आणि कर्ज मंजुरीचे अ‌ॅग्रीमेंट आणि डिजीटल धनादेश आणि रिझर्व बँकेचे नाव असलेली डिजीटल नोटीस पाठवत कर्ज मंजुर करण्याचे अमिष दिले.

कर्ज मंजुर करण्यासाठी जीवन विमा पाॅलिसी काढावी लागले, अ‌ॅग्रीमेंट सुरक्षेसाठी 6 टक्के रक्कम, आरटीजी चार्ज, सर्विस चार्ज, जीएसटी भरवाला लागले. असे सांगत बॅक खात्यात ऑनलाईन पैसे भरण्यास सांगीतले. दुसऱ्या संशयिताने कर्ज खात्यात डीडी देण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली असल्याचे सांगत त्याची फरकाची रक्कम भरण्यास सांगीतले. जीवन बिमा पाॅलिसीचे दोन हफ्ते बाकी आहेत, ते भरावे लागतील.

रिझर्व बँकेने तुमचे मेमोरंडम बँक खाते ब्लाॅक केले आहे. ते अनब्लाॅक करण्यासाठी तसेच कंपनीच्या मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅडिंगनुसार लोक खात्यात 50 टक्के रक्कम भरावी लागले. तसेच तुमच्या खात्यात एकही मोठा व्यावहार झाला नसल्याने क्रेडीट, डेबिट कार्ड करीता पैसे भरावे लागतील. रिझर्व बँकेच्या स्लाॅट मध्ये तुमचे लोन रक्कम बसत नाही. त्याकरीता टॅक्स भरावा लागले. लोन कॅन्सल करण्यासाठी प्रोसेसिंग फि म्हणून चार्ज द्यावे लागतील. बँकेने तुमचे लोन होल्ड केले आहे. असा विविध कारणे सांगत साळवे यांना 1 लाख 93 हजार ऑनलाईन भरण्यास सांगत फसवणूक केली. वरिष्ठ निरिक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...