आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण महिन्यानिमित्त त्र्यंबकेश्वर:सिटी लिंकच्या 10 जादा बस त्र्यंबकेश्वरसाठी

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिन्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी १० जादा बस सोडण्याचा निर्णय सिटी लिंक प्रशासनाने घेतला आहे. कोरोनानंतर आता सर्व निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे यंदा सर्वच सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. त्यामुळे यंदा श्रावणात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी देखील भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच श्रावण महिन्यातील साेमवारी विशेष गर्दी असणार आहे.

त्यामुळे भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सिटी लिंकच्या वतीने पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या सोमवारी दररोजच्या २२ बसेसव्यतिरिक्त १० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी त्र्यंबकेश्वरसाठी असलेल्या नियमित बसेसबरोबरच या अतिरिक्त १० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी या जादा बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन सिटी लिंकच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...