आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्षांपासून शहरातील स्मार्ट पार्किंग योजना सुरू होण्याआधीच बंद पडली होती. आता पार्किंगसाठी पालिकेने करार केलेल्या ट्रायजेन कंपनीशी सकारात्मक चर्चा झाल्याने पहिल्या टप्प्यात शहरातील ३३ पैकी १० ठिकाणी पार्किंगचे स्लॉट सुरू करण्यावर निर्णय झाला आहे. यासंदर्भात, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी कंपनीच्या प्रतिनिधींसोबत शुक्रवारी (दि.१७) झालेल्या चर्चेनंतर माहिती दिली. या बैठकीत कंपनीला रॉयल्टीत सवलत देण्यासह मुदतवाढ देण्याची प्रशासनाने तयारी दाखविली. सोबतच नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाईबाबत कंपनीला मदत करण्यासाठी पालिका पोलिसांनाची मदत घेणार असून सुरुवातीला दोन महिने प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा निशुल्क असणार आहे. त्यानंतर नियमित शुल्क आकारले जाणार आहे. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या १७ लाखांच्या रॉयल्टीत सूट, तर दुचाकीसाठी प्रतितास ५ ऐवजी १५, तर चारचाकीसाठी प्रतितास १० ऐवजी ३० रुपये शुल्कवाढीसह तीन वर्षांची मुदतवाढ तसेच टोईंग सुविधा सुरू करण्याची मागणी कंपनीने केली. त्यावर पालिकेने दीड वर्ष मुदतवाढ देण्याची तयारी दर्शविल्यावर कंपनी तीन वर्षे मुदतवाढ व तिप्पट शुल्कवाढीसह रॉयल्टीत सूट देण्यावर अडून बसली हाेती. दरम्यान, आयुक्त पवार, स्मार्ट सीटीचे सीईओ सुमंत मोरे आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत कंपनीच्या काही अटी तत्त्वत: मान्य करण्याची तयारी पालिकेने दर्शवली.
१० ठिकांणांची पाहणी केल्यानंरच प्रकल्पास मान्यता कंपनीने प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्प्यात पालिकेला १० ठिकाणांची यादी देण्याचे मान्य केले आहे. या १० ठिकाणी कंपनीला मदतीसाठी मनपा पोलिस आयुक्तांना पत्र देणार आहे. पार्किग स्लॉटच्या आजूबाजूला असलेल्या नो पार्किंग ठिकाणी वाहने लावणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतील. २ महिने हा प्रयोग केला जाणार असून त्याला मिळणारा प्रतिसाद बघून पालिका ठेकेदाराला सवलतीसह मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेणार आहे. या ठिकाणांची पहाणी करून सुविधा सुरू केली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.