आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 10 The Spread Of Dengue From The Government Office Itself! Manipulation Plays With The Health Of Citizens Along With Officials, Employees

10 सरकारी कार्यालयाकडूनच डेंग्युचा प्रसार!:मनपाकडून नाेटीसास्त्र; नागरिकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आराेग्याशी खेळ

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षा व मदतीसाठी कार्यरत असलेल्या जवळपास दहा प्रमुख सरकारी कार्यालयाकडून डेंग्युच्या प्रसारासाठी हातभार लावला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे पालिकेने संबधित कार्यालय प्रमुखांना नाेटीसा बजावून स्वच्छता व साफसफाई करून आपल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या आराेग्याची दक्षता घ्यावी असे आदेश काढले आहेत.

शहरात डेंग्यूसह साथीच्या आजारांना बिल्डर,सर्वसामान्य नागरिकांसोबतच आता शासकीय तसेच निमशासकीय कार्यालय देखील जबाबदार असल्याचे तपासणीत समोर आले आहे. शहरातील पोलिस वसाहती, जिल्हा रुग्णालय,संदर्भ सेवा रुग्णालय, एसटी डेपो,,कृषी विभाग,वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,विभागीय आयुक्तालय,बीएसएनएल,पोस्ट ऑफीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेंग्यू डासची उत्पत्नी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या आस्थापनाच्या प्रमुखांनाच नोटीस बजावली, त्यांना तात्काळ भंगार साहित्य हटविण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिका क्षेत्रात डेंग्युचा प्रभाव आहे. ऑगस्ट महिन्यातच डेंग्यूचे 99 रुग्ण आढळून आले असून तीन महिन्यात डेंग्यूबाधितांचा आकडा हा 178 पर्यंत गेला आहे. त्याबराेबरच चिकनगुन्याच्या रुग्णांची संख्या देखील 15 वर गेली आहे. अर्थात हे सरकारी आकडे असून खासगी रूग्णालयात संबधित आजारांची लक्षणे असलेले शेकडाे रूग्ण असल्यामुळे सध्यस्थितीत डास निर्मुलन हे महत्वाचे झाले आहे.

सद्यस्थितीत महापालिकेच्या मलेरिया विभाग कारभारावर टिका हाेत असून पेस्ट कंट्राेल ठेकेदारावर काेट्यवधी रूपये खर्च हाेत असतानाही डासांची उत्पत्ती हाेतेच कशी अशी विचारणा हाेत आहे. ही बाब लक्षात घेत मलेरिया विभागाने घराेघरी जावून डेंग्युची उत्पत्तीस्थानांचा शाेध सुरू केला आहे. याच तपासणीचा भाग म्हणून महापालिकेने बांधकाम व्यावसायिक,शासकीय कार्यालये आणि निमसशासकीय कार्यालये तसेच काही नागरिक अशा जवळपास 525 जणांना कारवाईच्या नोटीसा दिल्या आहेत. त्यात दहा प्रमुख सरकारी कार्यालयेही आढळल्यामुळे आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

ही प्रमुख कार्यालये रडारावर

महापालिकेने केलेल्या तपासणीत शहरातील पोलीस वसाहती, जिल्हा रुग्णालय,संदर्भ सेवा रुग्णालय, एसटी डेपो,,कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,विभागीय आयुक्तालय,बीएसएनएल,पोस्ट ऑफीस, जिल्हा परिषद, नाशिकरोड व पंचवटी पोलिस स्टेशन,आदिवासी विभागचे वसतीगृह ,वन विभागाच्या कार्यालयामध्ये पडलेल्या भंगार साहित्य,टायर्स व निकामी वस्तुंमध्ये मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याने मलेरिया विभागाने या संबधित विभागांना नोटीसा बजावल्या आहेत.

तात्काळ नाेटीसा बजावल्या

''शहरात डेंग्युची उत्तप्तीस्थाने वाढत असून त्याचा नायनाट करण्यासाठी मलेरिया विभागाची माेहीम सुरू आहे. शहरातील अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयांत अस्वच्छता असल्याच्या तक्रारी आल्यामुळे प्रत्यक्ष तपासणी करून जेथे डेंग्युच्या अळ्या सापडल्या अशा संबधीत कार्यालयांना नोटीसा बजावून तातडीने स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत.'' -डॉ. राजेद्र त्र्यंबके, मलेरिया विभाग प्रमुख

बातम्या आणखी आहेत...