आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथॅलेसिमिया मेजर या वैद्यकीय स्थितीतील १० वर्षीय बालकावर हाफ मॅच मज्जारज्जू प्रत्याराेपण (बोनमॅरो ट्रान्सप्लांट) येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये यशस्वी करण्यात आले. मुंबई वगळता उत्तर महाराष्ट्रासह राज्यात प्रथमच अशा प्रकाराचे यशस्वी प्रत्याराेपण करण्यात आल्याची माहिती माहिती एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राज नगरकर, रक्तविकार तज्ज्ञ डॉ. प्रियतेश द्विवेदी, डॉ. अंबर गर्ग यांनी पत्रकार परीषदेत दिली.याबाबत अधिक माहिती देतांना डॉ. राज नगरकर यांनी सांगितले की, थॅलेसिमियाग्रस्त बालकांच्या शरीरात रक्तनिर्मिती प्रक्रिया विस्कळीत झालेली असते.
त्यामुळे बाहेरून रक्त द्यावे लागते. त्यांना आयुष्यभर बाहेरून रक्तपुरवठा करणे आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत मज्जारज्जू प्रत्याराेपण (बोनमॅरो ट्रान्सप्लांट) हा एकमेव पर्याय आशेचा किरण ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे रक्तनमुने पूर्णपणे जुळल्यास (फुलमॅच) अशा बालकांवर सहज मज्जारज्जू प्रत्याराेपण बोनमॅरो ट्रान्सप्लांट) करता येते. १० वर्षीय बालकाबाबत हाफ मॅच असताना त्याच्या वडिलांची इच्छाशक्ती व रुग्णालयातील तज्ज्ञ डाॅक्टरांचा आत्मविश्वास यांच्या जोरावर गुंतागुंतीचे प्रत्याराेपण यशस्वी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.