आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल वाढ:घरपट्टी वसुली 100 कोटी पार

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनामुळे गेल्या दाेन वर्षांत घरपट्टीचा घटलेला महसूल वाढवण्याबराेबरच चालू वसुलीसाठी आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आक्रमक पवित्रा घेत डिसेंबरपर्यंत विभागीय अधिकाऱ्यानी शंभर टक्के वसुली केली तर सत्कार, मात्र वसुली न झाल्यास खातेनिहाय वसुलीचे पत्र मिळेल अशी तंबी दिली होती. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले असून घरपट्टी व थकबाकी मिळून १५० काेटी वसुलीचे उद्दिष्ट असताना ११७ काेटीची वसुली झाली आहे. त्यामुळे जेमतेम ९० दिवसच वसुलीसाठी शिल्लक असून जवळपास ३२ काेटी वसुली करावी लागणार आहे.

गेल्या दाेन वर्षांत भरमसाठ कामे सत्ताधारी भाजप व विराेधक मिळून मंजूर केली. त्यामुळे दायित्व दाेन हजार काेटींपर्यंत गेले आहे. काेराेनामुळे थकबाकी पावणेतीनशे काेटींच्या घरात गेली आहे. त्यात बड्या शासकीय संस्थांकडून शंभर काेटींच्या आसपास दंड मिळून येणे बाकी आहे. ही बाब लक्षात घेत आॅक्टाेबर महिन्यापासून आयुक्तांनी वसुलीसाठी माेहीम तीव्र केली. पहिल्या टप्प्यात एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या १२५८ थकबाकीदारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करत या थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल वाजविण्यास प्रारंभकरण्यात आला.

मात्र, कालांतराने या माेहिमेला प्रतिसाद मिळत नसून ही बाब लक्षात घेत आयुक्तांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत कर विभागाच्या अधिकाऱ्यांबराेबरच विभागीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.त्यांना डिसेंबरपर्यंत १०० टक्के वसुली करा अन्यथा कारवाईला सामाेरे जावे असा अल्टिमेटम दिला. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

७५ काेटींपैकी ४३ कोटींची पाणीपट्टीची तूट
‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर पाणीपट्टी वसूल केली जाते. ७५ कोटी रुपये महसुलाचे उद्दिष्ट असताना ३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी ८० कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

बातम्या आणखी आहेत...