आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक फटका:काकडी, शेवगा, गवार, दोडका, भेंडीची किलाेसाठी शंभरी पार ; गृहिणींचा कल पर्यायी भाज्या घेण्याकडे

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसांपासून दोडके, गवार, काकडी, शेवगा यांची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात त्यांचे दर गगनाला भिडले आहेत. तर उर्वरित भाजीपाल्याचे दर हे ग्राहकांच्या आवक्यात आहे. त्यामुळे ग्राहकांनी काकडी, गव्हार, शेवगा या भाज्यांची नागरिक विशेषत: गृहीणींकडून खरेदी कमी कमी हाेत असून पर्यायी म्हणजे गाजर, टाेमॅटाे यांची खरेदी अधिक हाेत असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

दोन आठवड्यापूर्वी भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना वाहतूक खर्च देखील मिळत नव्हता. त्यावेळी मात्र यामध्ये व्यापाऱ्यांचा आणि ग्राहकांचा फायदा झाला हाेता. तसेच किरकोळ विक्रेत्यांना देखील भाडे वाहतूक, महापालिका पावतीचा खर्च करावा लागताे. अशा विविध बाजूने येणाऱ्या खर्चामुळे काकडी, शेवगा, गवार, दोडका, भेंडी याचे उत्पादन घेतलाले शेतकरी ताेट्यात जात आहे. बाजारात माल आला तरी त्याची भाववाढ झाल्याने काहीअंशी त्याच्या विक्रीवर परिणाम झाल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

गाजर, मटार अवाक्यात; बाजारात खरेदी वाढली थंडीच्या दिवसांत गाजर आणि मटार बाजारात माेठ्या प्रमाणात येत असतात. त्याला मागणीही चांगली असते. सध्या किरकाेळ बाजारात गाजर आणि मटार दाेन्ही ३० ते ४० रुपये किलाे दराने उपलब्ध आहेत.त्यामुळे त्याची खरेदी वाढल्याचे विक्रते सांगतात.

सगळ्यांनाच परवडेल असे दर हवे भाजीपाला दर काही प्रमाणात वाढल्याचे जाणवते आहे. मात्र शेतकऱ्यांना आणि ग्राहकांनाही परवडायला हवे असे दर भाजीपाल्याचे असावे. सध्या थंडी असूनही काकडी, शेवगा यांचे दर वाढले आहे. - स्वाती सानप, गृहिणी

ठराविक भाजीपाल्याची आवक घटली २ आठवड्यंापासून भाजीपाल्याचे दर घसरलेलेच आहेत. ठराविक भाजीपाल्याची आवक घटून त्यांच्या दरात वाढ झाली आहे. वाहतूक खर्चही वाढल्याने परिणामी दरवाढ हाेते. - वैभव सावळे, भाजीपाला विक्रेता

बातम्या आणखी आहेत...