आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:नाएसोच्या 3 शाळांचा 100 टक्के निकाल ; उज्ज्वल यशाची परंपरा कायम

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या ११ शाळांचा शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. संस्थेच्या तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळांपैकी इंग्लिश मीडियम स्कूल उंटवाडी, सिडको व एम. एस. कोठारी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांनी यंदाही १००% निकालाची परंपरा कायम राखली असून संस्थेच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे या एकमेव आश्रमशाळेने १००% निकाल लावून उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. संस्थेच्या श्रीमती रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम स्कूलचा निकालदेखील ९९.५७% लागला आहे. पेठे हायस्कूलचा निकाल ९६ टक्के, मातोश्री सारडा कन्या शाळेचा निकाल ९९.५ टक्के, माध्यमिक विद्यालय उंटवाडी शाळेचा निकाल ९७.४१ टक्के, डी. एस. कोठारी शाळेचा निकाल ९८.८८ टक्के तर सी. डी. ओ. मेरी शाळेचा निकाल ९६.५५ टक्के लागला आहे. नवीन इंग्रजी शाळा ओझर शाळेचा निकाल ९२.३० टक्के, भगूर येथील ति. झं. विद्यामंदिर शाळेचा निकाल ९० टक्के लागला आहे. मुख्याध्यापक कैलास पाटील, प्रियंका निकम, नरेंद्र मोहिते, सुनील सबनीस, मधुकर पगारे, कुंदा जोशी, सुनीता जोशी, संगीता थोरात, गोपाळ उघडे, नंदा पेटकर, सरिता देशपांडे, स्वाती परचुरे यांच्यासह मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम, विश्वस्त दिलीप पेठे, रमेश चांदवडकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...