आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:100 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धा परीक्षांचे बदलते स्वरूप विद्यार्थ्यांनी एकदिवसीय शिबिरातून जाणून घेतले. १०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला.विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिबिर पार पडले. अटलबिहारी वाजपेयी जयंती ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती तसेच अटल युवा पर्व अंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर भाजयुमोच्या वतीने के.व्ही.एन. नाईक महाविद्यालयात झाले. अश्वमेध अकॅडमीचे संचालक प्रा. मनीष बोरस्ते यांनी पोलिस व अग्निवीर भरती यावर मार्गदर्शन केले.

प्रा. जी. आर. खैरनार यांनी सरळसेवा आणि प्रा. प्रशांत ताकाटे यांनी एमपीएससीचे बदलते स्वरूप यावर मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव, संतोष नेरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...