आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:नाशिक सेवा समिती ट्रस्टतर्फे 1000 नागरिकांची माेतीबिंदू शस्त्रक्रिया

सचिन जैन | नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक परिस्थितीमुळे काेणाचाही आधार नाही, शिवाय दुर्गम भागात नशिबी आलेले खडतर जीवन. हीच बाब लक्षात घेत नाशिक सेवा समिती ट्रस्टने अशा नागरिकांच्या आराेग्य संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले. समितीच्या वतीने आतापर्यंत दुर्गम भागातील १० हजारांहून अधिक नागरिकांची माेफत नेत्रतपासणी करण्यात आली. यात एक हजार रुग्णांवर माेफत माेतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवनात नवी दृष्टी समितीने दिली.

नाशिक सेवा समितीच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यामध्ये सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक व आराेग्यसेवा यासंदर्भात विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेच्या वतीने गरीब व गरजू लाेकांसाठी नि:शुल्क धर्मार्थ दवाखान्याच्या माध्यमातून अनेकविध रुग्णांवर उपचार केले जातात. तसेच राेज शहरातील झाेपडपट्टी परिसरात माेबाइल व्हॅनच्या माध्यमातून डाॅक्टरांकडून त्या नागरिकांची माेफत आराेग्य तपासणीदेखील केली जाते. संस्थेच्या वतीने आतापर्यंत शहरासह ग्रामीण भागातील १० हजार नागरिकांची माेफत नेत्रतपासणी करण्यात आलेली आहे. तसेच या तपासणीत माेतीबिंदूचा त्रास आढळून आलेल्या १००० रुग्णांवर माेफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

आज आराेग्य तपासणी शिबिर
नाशिक सेवा समितीच्या वतीने साेमवार ते शनिवार या दिवशी शहरातील झाेपडपट्टी परिसरात नागरिकांची तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मदतीने आराेग्य तपासणी व आैषधाेपचार केले जाते. तर रविवारी (दि. ४) शहरालगत असलेल्या आदिवासी, दुर्गम पाड्यावरील नागरिकांची आराेग्य तपासणी करत त्यांना मदतीचा हात दिला.

आज नेत्रतपासणी शिबिर
नाशिक सेवा समिती ट्रस्ट व तुलसी आय हाॅस्पिटल याच्या संयुक्त विद्यमाने नेत्रतपासणी शिबिराचे रविवारी (दि. ४) आयाेजित करण्यात आले आहे. निरा ताराचंद गुप्ता धर्मार्थ दवाखाना, पहिला मजला, सुमंगल अपार्टमेंट, शरणपूरराेड येथे सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबिर आहे. गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयाेजकांच्या वतीने करण्यात आले.

आराेग्य संवर्धनासाठी पुढाकार
गरीब, वंचित घटकातील नागरिकांच्या आराेग्य संवर्धनासाठी नाशिक सेवा समिती ट्रस्टच्या वतीने नियमित नेत्रतपासणी, आराेग्य तपासणी शिबिर राबविले जाते. या माध्यमातून अनेक नागरिकांना मदतीचा हात देण्यात येणार आहे.- राजेश पारीख, अध्यक्ष, नाशिक सेवा समिती ट्रस्ट

बातम्या आणखी आहेत...