आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१०८ वा कुंडीय महायज्ञ साेहळा १९ ते २७ नाेव्हेंबर या दरम्यान वृंदावन येथे हाेणार आहे. तब्बल ४० एकरवरील या यज्ञात साेहळ्यात ४ ते ५ लाख भाविक सहभागी हाेणार असून यात नाशिक शहर व जिल्ह्यातून एक हजाराहून अधिक भविक सहभागी हाेतील. साेहळ्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांची वंृदावन येथे निवासासह जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे श्री स्वामी भरतदासाचार्य महाराज यांनी नाशिक दाैऱ्यावर आले असताना स्पष्ट केले. त्यांच्याशी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने संवाद साधला.
विश्वशांतीसह सनातन धर्माच्या प्रचारासाठी २० डिसेंबर १९७१ राेजी पहिला यज्ञ झाल्याची आख्यायिका आहे. गेल्या ५२ वर्षांत देशातील विविध १०७ शहरात १०७ श्री लक्ष्मीनारायण महायज्ञ करण्यात आले आहे. पुढील महायज्ञ आता वृंदावनला हाेत आहेे.
महायज्ञाबाबत समाजात माहिती व्हावी यासाठी स्वामी भरतदासाचार्य यांनी नाशिकचा दाैरा केला. वैदिक विधीच्या माध्यमातून संसारातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावी या उद्देशाने भरतदासाचार्य महाराज यंानी १०८ श्री लक्ष्मीनारायण महायज्ञाचा संकल्प केला हाेता. साेहळ्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. देशभरातील ७५० ब्रह्मवृंद या साेहळ्याचे पाैराेहित्य करतील.
एका कुुंडासाठी अशी सामग्री...
या यज्ञात १०८ कुंंड असणार आहे. त्यापैकी आहुतीसाठी एका कुंडासाठी ७० किलाे तीळ, ३५ किलाे तांदूळ, १७.५ किलाे जवस, ८.७५ किलाे साखऱ ,४.५ िकलाे तूप, ४.५ किलाे हवन सामग्रीचा समावेश असणार आहे.
२५ व्या वर्षीच केला हाेता पहिला यज्ञ
श्री स्वामी भरतदासाचार्य महाराज हे २५ वर्षांचे असताना १९७१ मध्ये मध्य प्रदेशमधील कटनी या ठिकाणी पहिला यज्ञ केला हाेता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मध्य प्रदेश,़राजस्थान , गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, हैदराबाद,़ पश्चिम बंगाल,़ आसाम,़ हरियाणा अशा राज्यांतील विविध शहरात आतापर्यंत १०७ वे यज्ञ आतापर्यंत यशस्वीपूर्ण केले आहे.
२००३ मध्ये नाशिकला हाेता मान
२००३ मध्ये हा यज्ञ साेहळा नाशिकमध्ये कुंभमेेळा हाेता तेव्हाच पार पडला हाेता. तेव्हाही देशभरातून लाखाेंच्या संख्येने भाविक नाशिकमध्ये आले हाेते. आता नाशिकचे भाविक त्याच उत्साहाने वृंदावनला जातील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.