आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंड वसूल:1000 किलो प्लास्टिक जप्त ; राज्यात सर्वात मोठी कारवाई -पालिकेचा दावा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्लास्टिक या अविघटनशील कचऱ्यामुळे मानवी तसेच निसर्गावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेत नाशिक शहर टास्क फोर्सने महापालिका क्षेत्रात पूर्णत: प्लास्टिकबंदी केल्यानंतरही त्याचा सर्रास वापर होत असल्याचे पुढे आले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दहा महिन्यांमध्ये २०२४ किलो प्लास्टिक जप्त करून १८ लाख ५५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यातील १००० किलो प्लास्टिक सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये अर्थातच गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीमधील आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२१मध्ये सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ संमत केला. त्यानुसार टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभरात प्लास्टिकबंदी लागू केली जात आहे. पहिल्या टप्प्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह वस्तूंवर बंदी लावली आहे.

या आस्थापनांमध्ये बंदी
नागरिक, संस्था, कार्यालये, दुकाने, हॉटेल्स, खानावळ, दूध विक्रेते, भाजी विक्रेते व अन्य सर्व प्रकारच्या कुठल्याही आस्थापनामध्ये प्लास्टिकचा वापर किंवा साठवणूक झाल्यास नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...