आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासदगुरुदेव श्री सतपालजी महाराज प्रणीत मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. यासाठी शहर व जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत एक हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. अध्यात्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या मानव उत्थान सेवा समितीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. समितीच्या वतीने शहरातील सातपूर, सामनगाव परिसरासह तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. सावरगाव येथे गंगापूर धरणाजवळ २०० आंबा, नारळ, आवळ्यासारखी देशी रोपे लावण्यात आला. आळंदी धरणाजवळ आंबा, पेरू, कडूनिंब, अंजीर, पिंपळाची रोपे लावण्यात आली. समितीच्या नाशिक प्रबंधक साध्वी हीराबाईजी, साध्वी तीरथजी, साध्वी पंकजाजी यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.