आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनी:मेकॅनिकलचे 103 विद्यार्थी कॅम्पसद्वारे नामांकित कंपनीत

नाशिक8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या १०३ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झालीआहे. मुंबई येथीलआरडीसी काँक्रीट प्रा. ली., पुणे येथील इन्फोसिस, टीसीएस, कॅपजेमिनी, विप्रो, यश ग्रुप, नाशिक येथील क्रॉम्प्टन ग्रीव्हज, महिंद्रा अँड महिंद्रा, सीमेन्स, महिंद्रा सोना, किमाया स्टील, मेटल डस्ट प्रा.लि., इनोवॅट्स, ऑटोमेशन, कोणार्क ग्लोबल या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेज मिळालेआहे. शिक्षण घेताना नोकरीच्या संधी उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांना बराच दिलासा मिळत असून, त्यासाठी मेट इंजिनिअरिंग संस्थेच्या वतीने कॅम्पस मुलाखतीचेआयोजन करण्यातआले. यात विविध कंपन्यांनी सहभाग नो‌ंदवत विद्यार्थ्यांची निवड केली. विद्यार्थी निवड प्रक्रिया ही योग्यता, गटचर्चा, तांत्रिक मुलाखत आणि वैयक्तिक मुलाखत या चार टप्प्यांद्वारे करण्यातआली. त्याची संपूर्ण तयारी प्लेसमेंट टीम आणि मेकॅनिकल विभागाच्या शिक्षकांकडून करून घेतली होती. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे, औद्योगिक भेटींचे आयोजन केले होते.