आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुसिव्ह:वर्षभरात विनाहेल्मेट 107 वाहनचालकांचा अपघातात मृत्यू; शहरात सर्वाधिक अपघात दुचाकींचे, हेल्मेट वापराकडे चालकांचे दुर्लक्ष ठरतेय मृत्यूचे कारण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारी ते डिसेंबर २०२१ या काळात सर्वाधिक ३५३ अपघात दुचाकींचे झाले. अतिवेगामुळे झालेल्या ५२ अपघातात ४२ पुरुष व ११ महिलांनी तर ९९ अपघातात हेल्मेट नसल्याने ९८ पुरुष आणि ९ महिलांनी आपला जीव गमावला. विनाहेल्मेट ६५ जण तर अतिवेगाने झालेल्या अपघातात २२५ जण कायमचे जायबंदी झाले. शहरात विनाहेल्मेट दुचाकीचालक अतिवेगाने दुचाकी चालवत असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.

वर्षभरात गंभीर अपघात
वर्षभरात ओव्हर स्पीड ५२ अपघातात ४२ पुरुष, ११ महिला असे ५३ मृत्यू. विनाहेल्मेट ९९ अपघातात ९८ पुरुष, ९ महिला असे १०७ मृत्यू आणि ओव्हर स्पीडच्या १६१ गंभीर अपघातात १७२ पुरुष, ५३ महिला असे २२५ तर विनाहेल्मेट ४१ अपघातात ५५ पुरुष, १९ महिला असे ६५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...