आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये धक्कादायक घटना:दहावीच्या मुलीची अकरावीच्या मुलाकडून छेड, प्रतिकार केल्याने घेतला मुलीच्या मानेला चावा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलांची गुन्हेगारीतील सक्रीयता हा अलीकडे गंभीर विषय होत असून म्हसरुळ परिसरात असाच एक गुन्हेगारीचा प्रकार घडला. अल्पवयीन मुलाने परिसरातीलच राहणाऱ्या एका दहावीच्या मुलीचा विनयभंग केला. तीने आरडाओरड केल्याने मुलाने तिच्या मानेवर चावा घेत तिला गंभीर जखमी केले. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुकशुक करुन थांबवले

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पिडीत मुलीने दिलेल्या माहितीनुसार, म्हसरुळ परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी दहावीला शिक्षण घेते. सायंकाळी सात वाजता क्लास वरुन घरी पायी जात असतांना उद्यानाच्या प्रवेशद्वारा समोर परिसरात राहाणारा अकारावीचा ओळखीचा मुलाने शुकशुक करत थांबवले.

कपडे काढण्याचा प्रयत्न

काही बोलण्याच्या आत संशयिताने मुलीचा हात पकडून तिला अंधारात ओढून नेले. तिच्यावर बळजबरी करीत असताना मुलीने आराडाओरड केली. संशयिताने मुलीला मारहाण करत तिचे तोंड दाबून ठेवत कपडे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुलीने त्याला प्रतिकार केला.

मुलीला जखम

संशयिताला राग आल्याने त्याने मुलीला चावा घेत जखमी केले. मुलीच्या मानेवर चावल्याने जखम झाली असून रक्त निघाल्यानंतर संशयिताने मुलीला सोडून पळ काढला. मुलगी रडत रडत घरी गेल्यानंतर आईला संशय आला. तिने मुलीला विश्वासात घेत माहिती घेतली असता मुलीवर बळजबरी झाल्याचे निदर्शनास आले.

म्हसरुळ पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य घेत संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरिक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

संशयित ताब्यात पालकांना समज

संशयित हा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पालकांना बोलवून घेत समज दिली. बाल न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला सोडून देण्यात आले.

परिसरात भीतीचे वातावरण

या घटनेमुळे मुलींच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी मुलींना एकटे जाण्यास पालक घाबरत आहे. म्हसरुळ परिसरात निर्जन ठिकाणी असे प्रकार घडत असल्याने सायंकाळी मुलांना सोडण्यासाठी आणि घेण्याकरीता पालकांनी सोबत यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...