आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:दोन दुचाकीचाेरांकडून 11 दुचाकी जप्त

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व परिसरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अनिकेत ऊर्फ सनी नंदराज आहिरे (रा. शरणपूररोड), संदीप नामदेव पवार (रा. नवेगाव, सटाणा) अशी या दुचाकीचोरांची नाव आहेत. दुचाकी चोरी प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी, दुचाकीचोरी प्रतिबंधक पथकाचे विशाल पाटील, मनोहर शिंदे, स्वप्नील जुंद्रे, मुश्रीफ शेख यांना दोघे चोरीची दुचाकी वापरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने पाळत ठेवत त्यांना ताब्यात घेतले.

दुचाकीच्या कागदपत्रांची चौकशी केली असता दाेघांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. पथकाने अधिक चौकशी केली असता संशयितांनी सातपूर परिसरातून तीन नाशिकरोड, अंबड, मुंबईनाका आणि कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी चार दुचाकींची चोरी केल्याचीच कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, अविनाश देवरे, केतन कोकाटे, विनोद लखन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...