आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची गर्दी:दिवाळीत एसटीला 11 काेटींचे उत्पन्न; दीड काेटी प्रवाशांचा प्रवास

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या १० दिवसांच्या काळात एसटीच्या बसमधून दीड काेटी प्रवाशांची प्रवास केला. या माध्यमातून एसटीला ११ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांची हाेणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून नियोजन करत जादा बस सोडण्यात आल्या हाेत्या. पुणे मार्गावर दर १५ मिनिटाला तर धुळे, मालेगाव, मुंबईसह विविध मार्गांवर दर अर्ध्या तासाला बस सोडण्यात येत हाेत्या. नाशिक शहरातील नवे सीबीएस, महामार्ग बसस्थानकासह विभागातील सर्वच बसस्थानकात गर्दी हाेती. दिवाळीच्या काळात एसटी महामंडळातर्फे हंगामी भाडेवाढ करण्यात आली हाेती. यामुळे २१ नाेव्हेंबर ते ३१ नाेव्हेंबर या कालावधीत एसटीला ११ काेटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.

बातम्या आणखी आहेत...