आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालपरीचा विक्रम!:10 दिवसात 11 कोटींचे उत्पन्न; दिवाळीनिमित्त जादा गाड्यांमधून दीड कोटी नागरिकांचा प्रवास

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन वर्षानंतर काेराेनाचे हटलेले निर्बंधामुळे पर्यटनासह धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची यावेळी माेठी गर्दी झाली हाेती. तसेच दिवाळीच्या दहा दिवसांच्या काळात एसटी महामंडळाच्या बसेसमधून दीडकाेटी प्रवाशांनी प्रवास प्रवास केला आहे.

यामधून एसटीला तब्बल 11 काेटीचे उत्पन्न मिळाले आहे. दिवाळीच्या काळात प्राप्त झालेल्या उत्पन्नातून एसटीचा ताेटा कमी हाेण्यास मदत हाेणार आहे.

काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा शासनाच्या वतीने सण उत्सवावरील निर्बंध हटवण्यात आलेे हाेते. यामुळे नागरिकांना सुट्ट्यााच्या काळात मुक्त संचार करता आला. बाजारपेठेत यामुळे उत्साहाचे वातावरण देखील बघावयास मिळाले. याचमुळे सुट्ट्याच्या कालावधित अनेक नागरिकांकडून पर्यटनासह धार्मिक स्थळांवर जाण्यास पसंती दिली जात हाेती. प्रवाशांची हाेणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून नियाेजन करत जादा बसेस साेडण्यात आलेले हाेते.

पुणे मार्गावर दर पंधरा मिनिटाला तर धुळे,मालेगाव, मुंबईसह विविध मार्गावर दर अर्ध्या तासाला बससाेडण्यात आलेल्या हाेत्या.जादा बसेसमुळे एसटी महामंडळाच्या शहरातील नवे सीबीएस, महामार्ग बसस्थानकासह विभागातील सर्वच बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या रांगा लागल्याची परिस्थिती पहावयाास मिळत हाेती.तसेच दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाच्या वतीन हंगामी भाडेवाढ देखील करण्यात आली हाेती. याचमुळे 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत एसटी महामंडळाच्या बसेसमधून तब्बल दीड काेटी प्रवाशांनी प्रवास केला. या माध्यमातून एसटी महामंडळाला दिवाळीच्या दहा दिवसाच्या कालावधीत 11 काेटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहेे. सण-उत्सवाच्या काळात एसटी महामंडळाला मिळालेल्या अधिकच्या उत्पन्नामुळे अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी अविरत धावणारे एसटी महामंडळाला काेराेनाच्या निर्बंधामुळे दाेन वर्षांपासून ताेटा सहन करावा लागत हाेता.तसेच त्यानंतर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे या ताेट्यात अधिकच भर पडली हाेती. मात्र आता पुन्हा एसटीचे चाके धावू लागल्याचे एसटीच्या उत्पन्नात भर पडत आहे. दरम्यान आगामी काळात अधिकाधिक उत्पन्न प्राप्त हाेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...