आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजय भोलेचा गजर करीत एक लाखावर भाविकांनी पहिल्या श्रावणी साेमवारी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. पहाटे चार वाजेपासूनच भाविक रांगा लागल्या हाेत्या. पेड दर्शनाकरिता अडीच तास तर माेफत दर्शनासाठी सहा तासांपेक्षा जास्त वेळ लागला. गर्दी लक्षात घेता तीन वेळा पेड दर्शन बंद करावे लागले.
देवस्थानकडून प्रति माणूस दोनशे रुपये आकारून पेड दर्शनाचीही व्यवस्था उपलब्ध असल्याने व निम्म्यावेळात दर्शन होत असल्याने सायंकाळपर्यंत पाच हजारावर भाविकांनी याचा फायदा घेतला ज्यातून अकरा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न देवस्थानला मिळाले. कोरोना कालावधीनंतर आलेला हा पहिलाच श्रावणी साेमवार असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. दुपारी पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवून पालखी काढण्यात आली. पालखी समवेत विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम, तृप्ती धारणे, पंकज भुतडा, भूषण अडसरे उपस्थित होते.
दर्शनासाठी मंदिराबाहेर लागले स्क्रीन
कोरोनामुळे दोन वर्षे मंदिरे बंद असल्याने यावर्षी भाविकांचा ओघ.
वाहनतळ शहराच्या बाहेर दुरवर नेल्याने भाविकांचे हाल.
मंदिराबाहेर ज्याेतिर्लिंगाच्या दर्शनासाठी स्क्रीनची उभारणी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.