आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत सरकारच्या वैद्यकीयसह सर्वच पॅथींसाठीच्या केंद्रीय कौन्सिलच्या गोंधळामुळे विलंब झालेल्या मेडिकल, डेंटल, आयुर्वेदा, युनानी अणि होमिओपॅथी प्रवेशाला अता गती मिळाली आहे. सर्वच पॅथीचे मिळून अतापर्यंत ११ हजार १९० प्रवेश पूर्ण झाले आहेत. यामध्ये वैद्यकीय अणि डेंटल अभ्यासक्रमांसाठी २ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. तर युनानी, आयुर्वेदा अणि होमियोपॅथीसाठी पहिलीच फेरी पूर्ण झाली असून शिल्लक जागांची महाविद्यालयांकडून माहिती प्राप्त होताच त्यांच्यासाठी प्रवेशाचा पुढचा राउंड घेतला जाईल, असे राज्य सीईटी सेलच्या वतीने सांगण्यात आले.
वैद्यकीयसाठी ६ हजार ६७४ जागांसाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पैकी दोन फेऱ्यांनंतर तब्बल ६ हजारपैकी तब्बल ५ हजार ६८४ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले होते. त्यातील ५ हजार ६४७ विद्यार्थी महाविद्यालयात हजरही झाले आहेत. तर डेंटल १०३६ विद्यार्थी महाविद्यालयांत हजर झाले आहे. दरम्यान आता शिल्लक असलेल्या जागांसाठी प्रवेशाची दुसरी फेरी राबवली जात असून, आज यादी जाहीर केली जाईल. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांनी २९ नोव्हेंबरपर्यंतच संबंधित महाविद्यालयात जाऊन अॅपला प्रवेश निश्चित करावा, असे राज्य सीईटी सेलच्या वतीने सांगण्यात आले आहे.राज्यभरातील ४८ वैद्यकीय अणि २९ दंतचिकित्सा महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांसाठी सध्या प्रवेश सुरू आहेत. त्यात २९ नोव्हेंबरला पहिला राउंड संपला आहे.
आयुर्वेदिक, होमिओपॅथी अणि युनानीची फेरी पूर्ण
वैद्यकीय अणि दंतचिकित्सा अभ्यासक्रमांसोबतच प्रतीक्षा असलेल्या आयुर्वेद, युनानी अणि होमिओपॅथी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचीही पहिली फेरी ३० नोव्हेंबरला पूर्ण झाली. आयुर्वेदासाठी पदवीच्या ३३८३ एकूण जागांपैकी ३३२२ जागांसाठी झालेल्या फेरी अंतर्गत १९२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेत महाविद्यालयांत ते हजर झाले आहे. तसेच होमिओपॅथीच्या ३४०४ पैकी २८४६ जागांसाठी झालेल्या फेरीअंतर्गत १५३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. युनानीच्या १०२ पैकी सर्व १०२ जागा पहिल्या फेरीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यात २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्ण करत महाविद्यालयात हजरही झाले.
फेरी अन् झालेले प्रवेश असे : वैद्यकीयसाठी ९९० जागांसाठी पहिली फेरी राबवण्यात आली. त्यात ४८० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश घेतले आहे. तर दंतचिकित्सा अभ्यासक्रमांच्या १३८६ रिक्त जागांसाठी झालेल्या या फेरीत ४३१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.
या जागांसाठी पुन्हा प्रवेश फेरी
वैद्यकीय (एमबीबीएस) च्या ५१० अणि डेंटल (बीडीएस) च्या १०५३ जागांसाठी पुन्हा तिसरी फेरी तर इतर पॅथींच्या शिल्लक जागांचा महाविद्यालयांकडून तपशील येताच त्यांच्यासाठी दुसरी फेरी राज्य सीईटीत सेलमार्फत राबवण्यात येणार आहे.
पदव्युत्तर पदवीसाठी अखेरची मुदत
पदवी अभ्यासक्रमांच्या आधीच वैद्यकीय अणि डेंटलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबरपर्यंतच प्रवेशाची मुदत होती. परंतु २ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यासाठी आज (दि.२) अखेरची मुदत आहे. विद्यार्थ्यांना तातडीने अर्ज भरावे लागतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.