आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन फेऱ्यानंतरही अकरावीच्या तब्बल 50 टक्के जागा रिक्तच:प्रवेशासाठी आता विशेष फेरी; वेळापत्रकही जाहीर

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहरातील शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा यांच्या मिळून 26 हजार 480 जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतंर्गत अकरावीच्या तीन नियमित फेऱ्या झाल्या असून यामध्ये केवळ 50 टक्केच विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. अकरावीसाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतरही नियमित फेऱ्यांमध्ये झालेल्या प्रवेशांची संख्या कमी राहिली आहे.

अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने आता विशेष फेरी राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे प्रवेशाची संधी मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत सहभागी होता येईल. विशेष फेरीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहेत.

निवड यादी प्रसिद्ध

अकरावीच्‍या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तिसऱ्या फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली. या फेरीत एक हजार 345 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दरम्‍यान रिक्‍त जागांसाठी पहिल्‍या विशेष फेरीचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या फेरीच्‍या नोंदणीसाठी (दि.25) ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर मंगळवारी दि. 30 ऑगस्टला गुणवत्ता, निवड यादी प्रसिद्ध होईल. पहिल्‍या दोन फेऱ्यांमध्ये 10 ते 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. तर तिसऱ्या फेरीत केवळ एक हजार 345 विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले.

पसंतीक्रम बदलण्याची संधी

महाविद्यालयांतील रिक्‍त जागांसाठी विशेष फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक आणि भाग दोन अंतर्गत पसंतीक्रम नोंदविण्यासाठी शनिवार दि. 27 ऑगस्टपर्यंत मुदत उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. यानंतर 28 व 29 ऑगस्‍ट असे दोन दिवस माहितीची प्रक्रिया करण्यासाठी राखीव ठेवलेले आहेत. तर 30 ऑगस्‍टला गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 2 सप्‍टेंबरपर्यंत मुदत असेल.

बातम्या आणखी आहेत...