आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:११ वीची विशेष फेरी ; आज यादी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी विशेष फेरीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी पसंतीक्रम नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यात सोमवारी (दि.५) गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यात पहिल्या पसंतीचे काॅलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना व इतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेणे अनिवार्य असेल.

अकरावीच्या तीन नियमित फेऱ्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष फेरी राबविली जात असून ३० ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतरही पहिल्या तिन्ही नियमित फेऱ्यांमध्ये झालेल्या प्रवेशांची संख्या कमी राहिली आहे. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा यांच्या मिळून २६ हजार ४८० जागा असून १३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने विशेष फेरी राबविली जात आहे. प्रवेशाची संधी मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

९ राेजी जाहीर हाेणार रिक्त जागांचा तपशील
विशेष फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक आणि भाग दोन अंतर्गत पसंतीक्रम नोंदविण्यासाठी आता २ सप्टेंबरपर्यंत मुदत हाेती. तर ४ सप्टेंबरपर्यंत माहितीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दि. ५ राेजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ८ सप्टेंबरपर्यंत मुदत असेल. ९ सप्टेंबरला रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल.

बातम्या आणखी आहेत...