आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 12 Hour Musical Marathon On Sunday; Organized For The First Time In Nashak On The Occasion Of Amrit Mahatsava Of Independence| Marathi News

दिव्य मराठी विशेष:रविवारी 12 तास म्युझिकल मॅरेथाॅन; स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त नाशकात प्रथमच आयाेजन​​​​​​​

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतातील प्रथम व जास्त कालावधी असलेला हिंदी सदाबहार गीतांच्या नॉन स्टॉप म्युझिकल मॅरेथॉन २०२२चे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. विश्वास ग्रुप व गीतगुंजन प्रस्तुत ही म्युझिक मॅरेथाॅन रविवारी (दि. ११) विश्वास गार्डन, सावरकरनगर, गंगापूररोड, नाशिक येथे सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत होणार आहे. मॅरेथाॅनचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते आणि विश्वास ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

नाशिकमध्ये संगीत क्षेत्रातील सर्व प्रसिद्ध, ज्येष्ठ, श्रेष्ठ व नवोदित गायक कलावंत यांचा एकत्रित संगम एका व्यासपीठावर व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीतप्रेमींसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असल्याने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर व गीतगुंजन म्युझिकल नाईट परिवाराचे भुषण कापडणे, प्रिया कापडणे यांनी केले आहे.

म्युझिक मॅरेथाॅन अशी...
सकाळी ९ ते ११ अनमोल रतन
स. ११ ते १ जीना यहाँ मरना यहाँ
दुपारी १ ते ३ हिटस् ऑफ ९०
दुपारी ३ ते ५ दर्द-ए-किशोर
सायंकाळी ५ ते ७ फिल्मी गझल
संध्याकाळी ७ ते १० हिटस् ऑफ आर. डी. बर्मन

वेगवेळ्या थीमवर गाणी
या म्युझिकल मॅरेथॉनमध्ये नाशिकमधील नव्या-जुन्या पिढीतील ६० हून अधिक गायक-कलाकार सहभागी होणार आहेत. त्यामध्ये एकूण १२६ गाणी सादर होणार आहेत. गाणी एकत्रितपणे व सलग न सादर होता, ती सहा वेगवेगळ्या थीमवर आधारित असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...