आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:12 तास, 60 गायक, 126 गाणी; रंगली म्युझिक मॅरेथाॅन ; नाशिककरांनी दिली भरभरून दाद

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी लतादीदींचे सूर तर कधी आशाताईंचे स्वर, कधी रफी की यादे तर कधी किशाेर कुमार यांच्या आठवणीत मैफल सुरावटींवर नेत तब्बल १२ तास, ६० गायकांनी १२६ गाणी सादर करून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला अन‌् त्याला नाशिककर गान रसिकांनी भरभरून दाद दिली.

भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतातील प्रथम व जास्त कालावधी असलेला हिंदी सदाबहार गीतांच्या नॉन स्टॉप म्युझिकल मॅरेथॉन विश्वास लाॅन्स येथे अत्यंत उत्साहात पार पडली. विश्वास ग्रुप व गीतगुंजन प्रस्तुत ही मॅरेथाॅन सकाळी ९ वाजता सुरू झाली. त्यात १२६ गाणी सादर करत रात्री १० वाजता मॅरेथाॅनचा समाराेप झाला. या मॅरेथाॅनचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि विश्वास ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डाॅ. पुलकुंडवार यांनीही गीत सादर करून आश्चर्याचा धक्का दिला. पुलकुंडवार यांच्यासह अनेक गायकांना रसिकांनी वन्समाेअर दिला. तर अनेक गीतांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

नाशिकमध्ये संगीत क्षेत्रातील सर्व प्रसिद्ध, ज्येष्ठ, श्रेष्ठ व नवोदित गायक कलावंत यांचा एकत्रित संगम एका व्यासपीठावर व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. ताे उद्देश या कार्यक्रमात सफल झाल्याचे दिसून आले. गीतगुंजन म्युझिकल नाईट परिवाराचे भूषण कापडणे, प्रिया कापडणे यांनी या कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते.

६ थीमवर गाणी
या म्युझिकल मॅरेथॉनमध्ये नाशिकमधील नव्या-जुन्या पिढीतील ६० हून अधिक गायक-कलाकार सहभागी झाले हाेते. सहा थीमवर ही मॅरेथाॅन पार पडली.

बातम्या आणखी आहेत...