आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहा अंकी आकड्यांची बेरीज.... वर्गमुळ अवघ्या काही क्षणांत साेडवत जागतिक स्तरावरील मेंटल कॅलक्युलेशन्स वर्ल्ड कप स्पर्धत नाशिकच्या आर्यन शुल्कने विश्वविक्रमासह विजेतेपद पटकावत सगळ्यांचेच लक्ष वेधले. १५ देशातील ४० स्पर्धक यात सहभागी झाले हाेते. यात आर्यनने विश्वविक्रम करत नाशिकचा शिरपेचात मानाचा तुरा खाेवला आहे.
जर्मनी येथील पेडरबोर्न येथे पार पडलेल्या मेंटल कॅलक्युलेशन्स वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आर्यन नितीन शुक्ल याने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत जपानचा ओनो टेस्तुया याने दुसरे, लेबनानच्या मुहम्मद अल मीर याने तिसरे, जपानच्या नाऊटो हिगा याने चौथे तर अमेरिकेच्या सॅम्युएल इंजेल याने पाचवे स्थान पटकावले. १५ देशातील सर्वोत्कृष्ट ४० ह्युमन कॅलक्युलेटरच्या या स्पर्धेत निवड करण्यात आली हाेती. या स्पर्धेत सर्वात वयस्कर स्पर्धक हा साठ वर्षांचा हाेता. तर १२ वर्षाच्या आर्यनने आपल्या पहिल्याच प्रयत्नात पराक्रम केला.
एमसीडब्ल्यूसी या नावाने मेंटल कॅलक्युलेशन्स क्षेत्रात नावारूपास असलेली ही स्पर्धा प्रतिष्ठितेची मानली जाते. गेल्या दाेन्ही स्पर्धेत जपानी खेळाडूंनी पाहिले दोन स्थान पटकावून आपला दबदबा निर्माण केलेला होता. तर २०२० मध्ये होणारी ही स्पर्धा काेविडमुळे २०२२ मध्ये पार पडली. ही स्पर्धा जिंकल्याने याच वर्षी दुबई येथे होणाऱ्या मेमोरियाड ऑलिम्पिक या ४ वर्षानंतर होणाऱ्या स्पर्धेत आर्यन सहभागी हाेणार आहे. कौतुकाची बाब म्हणजे आर्यन भारतीय चमू सोबत एकटाच या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याच्या या यशाने जागतिक स्तरावर नाशिकचे नाव उंचावले गेले ओह.
असे नाेंदविले आर्यनने विश्वविक्रम..
ही स्पर्धा लेखी स्वरूपाची असून यात १० विषयांची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी वेळ ७-१० मिनिटांचीच असते. त्यात १० अंकी १० संख्यांचे बेरीज करणे ज्यात आर्यनने ७ मिनिटांत २९ सेट सोडवले. तसेच ६ अंकी संख्येचे ५ अपूर्णांकापर्यंत वर्गमूळ काढणे ज्यात आर्यनने ७४ संख्यांचे अचूक वर्गमूळ १० मिनिटात काढून विक्रम केला जो आधी ४२ चा होता. तसेच जास्तीत जास्त १० अंकी भागीले ५ अंकी संख्या सोडवणे, दोन ८ अंकी संख्यांचे गुणाकार करणे, १००० या संख्येला सहा अंकी संख्येच्या वर्गमुळाने भागने असे आणि इतर असे १० प्रकारचे क्लिष्ट प्रश्न होते. या शिवाय स्पर्धेत सर्वांना स्वेच्छेने विश्वविक्रम करण्याची संधी देखील होती ज्यात आर्यनने. २० अंकी संख्येला २० संख्येने १ मिनिट ४५ सेकंदात गुणून आधीचे ३ मिनिटांचे रेकॉर्ड मोडले. ५ अंकी संख्येला ५ अंकी संख्येने कमी वेळात गुणायचे रेकॉर्ड देखील केले. ० अंकी संख्येला ५ अंकी संख्येच्या १० सेटला ४१ सेकंदात सोडवून नवा विश्वविक्रम केला जो आधी ५३ सेकंद हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.