आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:120 उद्योजकांना व्यवसायवृद्धीचे धडे

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयमा, विझ्डम एक्स्ट्राॅ कन्सल्टंट फायनान्सशियल सर्व्हिसेस, दि नॅशनल स्माॅल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन आणि स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशनतर्फे नाशिकमधील १२० उद्योजकांना व्यवसायवृद्धीचे प्रशिक्षण देण्यात आले. यात शासकीय योजना, ई-मार्केट, जीईएम पाेर्टलच्या माध्यमातून सरकारी संस्थांसाेबत उद्योग, व्यवसाय सुरू करण्याच्या संधी, उत्पादक, व्यावसायिकांना या माध्यमातून आपला उद्योग, व्यवसाय राज्य व राष्ट्रीय व स्तरापर्यंत विस्तारावयाच्या संधींबाबत माहिती देण्यात आली.

अंबड येथील आयमा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात निखिल पाटील यांनी उद्याेग व्यवसाय वाढीसाठीचे प्रयत्न सांगितले. त्यांनी पोर्टलचा परिचय करून दिला. जीईएममध्ये उत्पादने नोंदणी, निविदा तयारी आदींबाबत माहिती देण्यात आली. शासकीय संस्था, विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील विविध प्रकल्पांना आवश्यकता असलेली उत्पादने किंवा सेवांची खरेदी, नोंदणी जीईएमच्या माध्यमातून बंधनकारक केली आहे. या माध्यमातून २५ टक्के खरेदी सूक्ष्म आणि लघु उद्योगांकडून बंधनकारक केलेली आहे.

४ टक्के एससी, एसटी उद्योगांकडून खरेदी करणे तर ३ टक्के खरेदी महिला उद्योगांकडून करणे बंधनकारक आहे. प्रा. दीपाली चांडक यांनी सहभागींचे स्वागत केले. बिकाश नाईक, अपूर्वा काळे यांनी एनएसआयसीच्या माध्यमातून उद्योगांसाठी योजनांची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...