आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिज्ञासूवृत्ती:121 उपकरणांतून वैज्ञािनक दृष्टिकाेनवाढीसाठी प्रयत्न ; सातपूर येथील जनता विद्यालयात आयाेजन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व जिज्ञासूवृत्ती वाढावी यासाठी मविप्रच्या सातपूर येथील जनता विद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये तब्बल १२१ प्रकल्प आणि उपकरणांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली. प्रदर्शनात ५ वी ते ७ वीच्या गटात ५२, ८ वी ते १० वीच्या गटात ५८ आणि महाविद्यालयीन गटांतून ५ असे एकूण १२१ उपकरणे आणि प्रकल्पांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा सोडून विज्ञानाची कास धरावी. नवनवीन शोध लावून मानवी जीवन सुखद व आरोग्यदायी करण्यासाठी संशोधनालाच महत्त्व आहे. त्यासाठी जिज्ञासू वृत्ती विकसित होण्यासाठी विद्यालयाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेती, पर्यावरण, इलेक्ट्रिसिटी सिक्युरिटी, अन् वैद्यकीय क्षेत्रातील काही उपकरणांची मांडणी करत उत्तम कल्पानांचे सादरीकरण केले. अॅड. लक्ष्मणराव लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी संशाेधकवृत्ती विकसित करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी संचालक सयाजीराव गायकवाड, प्राचार्य संजय डेर्ले, उपप्राचार्या उषा कदम, सविता आहेर उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...