आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील तीन प्रश्नांमध्ये त्रुटी व चुका असल्याचे अखेर मान्य केले आहे. या प्रत्येक प्रश्नाचे दोन गुण म्हणजे एकूण सहा गुण परीक्षार्थींना देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनाच सहा गुण मिळतील, अशी अटही घालण्यात आली आहे. ज्यांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नच केलेला नाही त्यांना मात्र गुण मिळणार नाहीत.
बारावी बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे छापून आले होते. यात प्रश्नांच्या जागे ‘आन्सर की’चे पर्याय व पर्यवेक्षकांसाठीच्या सूचना प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे गोंधळलेल्या मुलांनी हे प्रश्न सोडवले नाहीत. याविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण मंडळाने ही चूक मान्य केली. इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाच्या प्रमुख नियामकांसमवेत मंडळाची एक बैठक झाली. त्यात प्रश्नपत्रिकेतील चुका झाल्याचे मान्य करणारा अहवाल संयुक्त सभेत सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हे सहा गुण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
या तीन प्रश्नांचे सहा गुण १ poetry section-2/ poetry/ section-2 असा उत्तरपत्रिकेत केवळ उल्लेख केला तरी... २ poetry section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास... ३ त्रुटी असलेल्या प्रश्नांचे क्रमांक (A-3, A-4, A-5) असे केवळ नमूद केले असल्यास... {वरील तीनपैकी कोणत्याही एका प्रकारचे लेखन विद्यार्थ्याने केले असल्यास विद्यार्थ्यास प्रत्येक प्रश्नाचे २ याप्रमाणे एकूण ६ गुण देण्यात येतील, असे बोर्डाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.