आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:1  जानेवारीपासून सीबीएसई तर्फे बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या वतीने (सीबीएसई) १ जानेवारी २०२३ पासून बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात होत आहे. अंतर्गत मूल्यांकन आणि प्रोजेक्ट वर्कची सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी सर्व सीबीएसई शाळांमध्ये बाह्य परीक्षकांमार्फत प्रात्यक्षिक घेण्याच्या सूचनाही बोर्डातर्फे देण्यात आल्या आहेत.याबरोबरच सीबीएसई बोर्डाने सर्व सीबीएसई शाळा, प्रादेशिक कार्यालयांना वेगवेगळे कृती वेळापत्रकही दिले आहे.

त्यानुसारच शाळांनी अंमलबजावणी करायची आहे. प्रात्यक्षिकांसाठी प्रयोगशाळा तयार असाव्यात, अंतर्गत आणि बाह्य परीक्षकही तयार करावेत. याबरोबरच विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती देण्याचेदेखील निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नाव, विषयदेखील तपासून पहायचे आहेत.

जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत. तसेच शाळांमध्ये वेळेवर उत्तरपत्रिका पोहाेचतील याची काळजी शाळांनी घ्यायची आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही फक्त बाह्य परीक्षकांच्या निगराणीतच होईल. विद्यार्थ्यांनीदेखील स्वत: काळजी घेऊन आपले नाव, विषय आणि परीक्षेच्या तारखांबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना सीबीएसई बोर्डाने दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...