आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मनमाडला 13 किलो प्लॅस्टिक जप्त; पालिकेची कारवाई

मनमाड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातलेली असतानादेखील शहरात विविध ठिकाणी सर्रास वापर होत आहे, यामुळे नगरपालिकेनेही प्लॅस्टिकबंदीविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. पथकाने भाजी मार्केट, नेहरू रोड, सरदार पटेल रोडवरील होलसेल, किरकोळ दुकांनामध्ये तपासणी करून शासनाने प्रतिबंधित केलेले १३ किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त केले.

यात कॅरीबॅग, प्लॅस्टिकचे ग्लास, थर्माकोल पत्रावळ्या सिल्व्हर कोटेड पत्रावळी आदींचा समावेश आहे. सोबतच प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या दुकानदारांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापूर्वीही अशी कारवाई करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिनकुमार पटेल यांच्या आदेशाने कडक कारवाईचा बडगा उचलला आहे. कारवाई या प्रसंगी कर अधीक्षक राजेंद्र पाटील, स्वच्छता निरिक्षक विजय सोनवणे, नगरपालिका वसुली विभागाचे पृथ्वीराज कोळगे, अशोक कटारे, कैलास पाटील आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...