आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती:मेरी शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारले शाडूचे 139 बाप्पा ; विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाएसाेच्या सीडीओ मेरी हायस्कूल येथे माजी नगरसेवक अरुण पवार व शालिनीताई पवार यांच्या सहकार्याने शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा शाळेच्या प्रांगणात पार पडली. गेल्या पाच वर्षांपासून पवार यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाडूमातीची गूर्ती तयार करण्याची संधी मिळत असल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी कौतुक केले. कार्यशाळेत १३९ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

या कार्यशाळेत कलाशिक्षक मनीषा मोरे व अभिलाषा घुगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पालक-शिक्षक संघाचे माजी कार्याध्यक्ष किरण काकड, शाळेचे मुख्याध्यापक सुनील सबनीस, उपमुख्याध्यापक गंगाधर बदादे, पर्यवेक्षक चिमण सहारे आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मनीषा मोरे यांनी केले तर अभिलाषा घुगे यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील बालकलाकार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांचे आई-वडील उपस्थित होते. अरुण पवार व शालिनीताई पवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल व विनामूल्य शाडूमाती उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक सबनीस यांनी आभार मानले.सर्व आकर्षक मूर्ती तयार करणारे बालकलाकार यांचे संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम, शाळा समिती अध्यक्ष पांडुरंग अकोलकर तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...