आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद शहरात फरार आरोपींचे वास्तव्य:14 गुन्हे उघडकीस; 28 तोळे सोन्यासह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद, परभणी येथील गंभीर गुन्ह्यात 3 वर्षापासून फरार आरोपी चे शहरात वास्तव्य असताना 15 घरफोडी, चोरी, लूट आणि खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे उघडकीस आले आहे. अंबड पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुन्हेगार अभिषेक उद्धव विश्वकर्मा, करण अण्णा कडूस्कर, ऋषिकेश अशोक रजगिरे या गुन्हेगारांना अटक केली. या टोळाने 14 घरफो़डी करुन तसेत 20 लाखांचा ऐवज जप्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेकी करुन घरफोडी

या बाबत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली, या संशयितांचे शहरात वास्तव्य असताना अंबड हद्दीतून रेकी करुन घरफोडी करत होते. उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, संदीप पवार, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

इतके गुन्हे झाले आहेत दाखल

अभिक्षेक विश्वकर्मा वर 24, करण कडूसकर 21, ऋषिकेश राज गीरे वर 21 गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत 14 गुन्हे उघडकीस आले आहे.

टोळीचे 6 संशयित फरार

संशयित टोळीचे आणखी 6 संशयितांची नावे निष्पन्न झाले आहे. त्यांचा शोध पोलिस अधिकारी घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...