आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PFIच्या 5 संशयितांना एटीएस कोठडी:जर्मन बेकरी स्फोट, हैदराबाद बॉम्बस्फोटाशीही कनेक्शन असल्याचा संशय

प्रतिनिधी | नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) मालेगाव, बीड, कोल्हापूर, पुणे येथून अटक केलेल्या पाच संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयाने पुन्हा १७ ऑक्टोबरपर्यंत १४ दिवसांची एटीएस कोठडी सुनावली. तपासी पथकाकडून सरकारी वकिलाने संशयितांचा जर्मन बेकरी व हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंध असल्याचा व विदेशात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचा संशय व्यक्त करीत कोठडी वाढवून मागितली.

4 शहरांतून 5 जणांना अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या निर्देशानुसार (एनआयए) महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने छापे टाकून २२ सप्टेंबरला देशभरातून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. नाशिक दहशतवादविरोधी पथकानेही मालेगावमधून मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी याच्यासह पुणे येथून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख, रझी अहमद खान, बीडमधून वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख, कोल्हापूरमधून मौला नसीसाब मुल्ला या पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. या पाचही संशयितांना तपासासाठी मुंबई येथे मुख्यालयात नेले होते.

आर्थिक व्यवहार उघड

दरम्यान, एटीएसची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा सोमवारी (३ ऑक्टोबर) नाशिकच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपासी पथकाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. अ‌ॅड. मिसर यांच्या युक्तिवादात तपासी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांच्या बँक खात्यांसह मोबाइलचे संभाषण तपासण्यात आले. त्यात आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले. संवादही संशयास्पद आहेत. काही संशयितांनी आखाती देशांमध्येही वास्तव्य केल्याचे समोर आले आहे.

मालेगावच्या मौलानाने घेतले होते गोळीबाराचे प्रशिक्षण
मालेगावमधून अटक केलेल्या मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी याने गोळीबाराचे प्रशिक्षण घेतलेले आहे. पुण्यातील बेकरी स्फोट आणि हैदराबाद दुहेरी ब्लास्टशी संघटनेचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे समोर येत आहेत. माैलानाने आणखी किती लोकांना प्रशिक्षित केले, याचा तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...