आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मेरी शाळेच्या शिक्षकांकडून नाएसोला 14 लाखांचा निधी

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विकासात आजी-माजी पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मेरी शाळेतील शिक्षकांकडून संस्थेस साडेबारा लाखांचा तर माजी शिक्षकांकडून स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने संस्थेस दोन लाखांचा कृतज्ञता निधी देण्यात आला. या १४.५० लाखाच्या निधीच्या माध्यमातून नवीन इमारत, काॅम्प्युटर, प्रयोगशाळांचे नूतनीकरण, सोलर पॅनल अशा सुविधा दिल्या जात असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी संस्थेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहे.

संस्थेच्या सीडीओ मेरी शाळेच्या प्रांगणात आजी-माजी पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा स्नेहमेळावा पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्यवाह राजेंद्र निकम, शाळा समिती अध्यक्ष पांडुरंग अकोलकर, कार्यकारी मंडळाचे सदस्य चंद्रशेखर वाड, विश्वास बोडके, सरोजिनी तारापूरकर, सचिन महाजन, प्रियंका निकम, नरेंद्र मोहिते, शैलेश पाटोळे, विजय मापारी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप अहिरे यांनी केले.

माजी शिक्षकांकडून नाएसाे संस्थेस निधी
शाळा समिती अध्यक्ष पांडुरंग अकोलकर यांनी एक लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली. माजी शिक्षिका रत्नावली ढगे यांनी ५१ हजार, व्ही. टी. जाधव यांनी ५ हजार रुपये, सतीश मुळे यांनी अडीच हजार, प्र. ल. सोनी यांनी ५ हजार रुपये, सीताराम सूर्यवंशी यांनी ११ हजार तर जय भालेराव यांनी ११ हजार देणगी दिली आहे.

माजी शिक्षकांचा संस्थेला विशेष अभिमान
नाशिक एज्युकेशन सोसायटीने शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. तसेच सीडीओ मेरी हायस्कूलने मेरी परिसरातील लाखो विद्यार्थ्यांना ४१ वर्षे सतत मार्गदर्शन केले असून शाळेने ४२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध क्षेत्रांत उत्तम यश संपादन केले आहे. संस्थेच्या माजी शिक्षकांचा संस्थेला विशेष अभिमान आहे. - प्रा. सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, नाएसो

बातम्या आणखी आहेत...