आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बनावट लिंक पाठवत विमा ग्राहकाला 14 लाखांचा गंडा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमा कंपनीचा एजंट कोड देण्याचे अमिष देत पाॅलिसीधारकाला तब्बल १४ लाख ४९ हजारांना गंडा घालण्यात आला. न्यायालयाच्या आदेशान्वये याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि अभय डोळे (रा. पाथर्डीफाटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१६ ते २०२२ याकालावधीत संशयित मनोज बजाज, देवरे, सत्यप्रकाश पांडे, कुलदीप सक्सेना आणि इतरांनी फोन करून फिर्यादी यांच्या पाॅलिसीकरिता वेगवेगळ्या एजंट कोडसाठी नेमणूक झाली असून त्यातून भविष्यामध्ये चांगले उत्पन्न मिळेल असे आमिष दाखवत पाॅलिसी एजंट कोड मिळवून देण्याचे आमिष देत बनावट लिंक पाठवत त्यावर १४ लाख ४९ हजार रुपये भरण्यास सांगितले.

बरेच दिवस होऊनही पाॅलिसी एजंट कोड मिळत नसल्याने डोळे यांनी संशयितांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयात तक्रार दिली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...