आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई भत्ता:लीग्रँड कारखान्यात 14 हजार रुपये वेतनवाढ, आठवा वेतनकरार यशस्वी

सातपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड औद्योगिक वसाहतीतील नोवतीयार इलेक्ट्रिकल अँड डिजिटल सिस्टम प्रा. लि. (लिग्रंॅड) कारखान्यात आठवा वेतन करार नुकताच संमत करण्यात आला आहे. कंपनी व्यवस्थापन आणि सीटू प्रणित नाशिक वर्कर्स युनियन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर १४ हजार ४५० रुपये वेतन वाढ करण्यात येणार आहे. या करारामुळे कामगारांचे वेतन दरमहा ६४ हजार रुपये होईल. १ जुलै २०२२पासून तीन वर्षांसाठी करार करण्यात आला आहे.

नवीन करारानुसार कामगारांना महागाई भत्ता ७ रुपये प्रती पॉईंट दराने मिळणार, मेडिक्लेम पॉलिसी २ लाखापर्यंत त्यापुढे हाेणारे जादाचे बिल कंपनी अदा करेल. शैक्षणिक कामासाठी ७५ हजार तर घर व लग्नासाठी १७ लाख रुपये कर्ज देण्यात येणार आहे. मेडिक्लेम पॉलिसी कामगार व त्यांची पत्नी यांना ७५ वर्षापर्यंत लागू राहील. कॅन्टीन सुविधा चालू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कामगारांच्या मुलांना पात्रतेनुसार नोकरीत समावून घेण्यात येईल. दरवर्षी सर्व कामगारांना २० टक्के बोनस देण्यात येणार आहे. वेतन करारावर कंपनीचे उपाध्यक्ष दीपक पाटील, एव्हीपी नितीन महाजन, एचआर अभय खरे, असिस्टंट जनरल मॅनेजर संजीव महापात्रा, एचआर समीर दाभाडकर, सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे, संतोष काकड यांनी स्वाक्षरी केल्या.

बातम्या आणखी आहेत...