आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:बिबट्या दिसताच 14 वर्षीय ‘आरिज’चे प्रसंगावधान ; जेरबंद करण्यास वनविभागाला यश

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी वेळ रात्री १० वाजून ३५ मिनिटाची...अचानक समोरच्या लाकडी वखारीतून एका बिबट्या बाहेर पडतांना दिसून आला आणि त्याच क्षणी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता घरात आज्जी सोबत एकटाच असलेला १४ वर्षीय धाडसी मोहम्मद आरिज काझी यांनी लगेचच आपल्या घरच्या सर्व दरवाजे खिडक्या लावून आज्जीला एका रुममध्ये ठेवून आपल्या वडीलांसह इतर लोकांना बिबट्याची माहिती देवून सतर्क राहण्याचे सागितले. आरिजच्या प्रसंगावधानामुळे दिडतासतच बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. यामुळे आरिजचे कौतुक केले जात आहे.

शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या वडाळा गावातील आयेशानगर भागात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास परिसरात आरफा बंगल्यात शिरत बस्तान मांडले. मात्र ज्यावेळी बंगल्यात असलेले आरिज काझी या १४ वर्षी मुलाला कळाले त्याने न घाबरता सर्वात पहिले बंगल्याचे दरवाजे खिडक्या बद करत तातडीने वडिलांसह शेजारील राहणाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. वडील एजाज काझी ही काही वेळातच हजर राहून वन विभागाशी सपर्क साधून त्यांना बोलवून घेतले. बिबट्याने बंगल्यातील कारखाली ठाण मांडून वनविभागाला हैराण केले. वनविभागाचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपरिमंडल अधिकारी अनिल अहिरराव यांनी वाहनाखाली दबा धरून बसलेल्या बिबट्याला आरिजने सागितलेल्या लोकेशनच्या मदतीने मोठ्या शर्थीने भुलीचे इंजेक्शन देत बिबट्याला बेशुद्ध केले. रात्री साडे दहा वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. दरम्यान मोठ्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाने बिबट्याला रेस्क्यू करत कार्यालयात रवानगी करण्यात आली. तसेच,वन विभागाच्या रेस्क्यूमध्ये ही आरिज याने बिबट्याचा ठिकाण दाखवून बिबट्या जेरबंद करण्यास हातभार लावल्याने त्याचे सगळीकडून कौतुक केले जात आहे.

बिबट्या असल्याचे समजताच केले फोन मला आमच्या बगल्याच्या पार्किंगमध्ये बिबट्या असल्याचे समजताच मी लगेचच वडीलांसह शेजारील अन्कलला फोन लावून यासंदर्भात माहिती दिली.त्यामुळे फॉरेस्ट ऑफिसर येपर्यंत कोणी ही त्याठिकाणी गेला नाही.घरात मी एकटाच होते.मला बिबट्या दिसत होता यामुळे त्याचे लोकेशन मी फॉरेस्ट ऑफिसरला देत होतो. -आरिज काझी

बातम्या आणखी आहेत...