आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक सराफ बाजारातील व्यावसायिकाने परिचित असलेल्या कुटुंबियांना वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी व साेने खरेदीसाठी उसनवार दिलेल्या रकमेच्या माेबदल्यात परिचिताने जमीन खरेदी करून देण्याचा बहाणा करीत सुमारे १ काेटी ६१ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यासंदर्भात, सराफी व्यावसायिक प्रशांत गुरव यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला असता न्यायालयाने संशयितांच्या विराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत पाेलिसांना चाैकशीचे आदेश दिले आहेत. गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मकरंद प्रभाकर दास्ताने, सुजाता मकरंद दास्ताने, शकुंतला प्रभाकर दास्ताने, विष्णू गांगुर्डे आणि संदीप गांगुर्डे या संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संशयित दास्ताने यांनी गुरव यांच्याकडून घरभरणी व सोने खरेदीकरिता वेळोवेळी ४४ लाख रुपये घेतले. हीरक्कम परत करण्यासाठी दास्ताने यांनी आदिवासी जमीनीचा व्यवहार केला.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील रामदास गांगुडे यांची आदिवासी मिळकत गुरव यांच्या नावे खरेदी खत करून घेततलेली रक्कम परत देण्याचे आश्वासन गुरव यांना दिले हाेते. दरम्यान, ही जमीन खरेदीसाठी २ लाख ३४ हजाराच नजराण्याची रक्कमही गुरव यांच्याकडून स्वत:च्या बॅंक खात्यात वळवून घेतली. त्यांनतर गुरव यांनी दास्ताने यांच्याशी संर्पक साधल्यानंतरही त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून गुरव यंाना संशय आला असता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ कायदा शाखेकडे माहिती अधिकारात माहिती मगाविली असता त्यात गुरव यांच्या नावावर शेतजमिन करण्याचा कुठलाही प्रस्ताव दाखल नसल्यचाे समजाताच त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
याबाबत गुरव यांच्या वतीने अॅड. राहूल पाटील यांनी न्यायालयात संशयितांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास आणून देताच न्यायालयाने पुरावे लक्षात घेता पाचही संशयितांविराेधात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी काडूस्कर यांनी गुन्हा दाखल करून चाैकशीचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.