आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष अभियान:जागतिक शाैचालय दिनानिमित्त जिल्ह्यात 15 दिवस विशेष अभियान

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात ३ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत विशेष अभियान राबवण्यात येत आहे. यात सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व सुशोभीकरण, वैयक्तिक शौचालय बांधकाम, अनुदान वितरण, बांधलेल्या शौचालयांचा शाश्वत वापर होण्याच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे.

दरवर्षी १९ नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालय संकुलांचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय बांधकाम आदी स्वरूपाची कामे करण्यात येत आहेत. ही कामे पूर्ण करून गाव हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्याची कार्यवाहीदेखील करण्यात येत आहे. हे विशेष अभियान राबविण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. या अभियानात ग्रामीण भागातील नागरिकांनीही सहभाग घेऊन आपले गाव हागणदारीमुक्त करून स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

माेहीम स्वरूपात हाेणार दुरुस्तीची कामे
या विशेष अभियानामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम, नादुरुस्त सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, शाळा, अंगणवाडीतील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, वैयक्तीक शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची काम पूर्ण करण्याबाबत मोहीम स्वरुपात काम करण्यात येणार आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम
७ ऑक्टोबर २०२२ च्या परिपत्रकानुसार शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात बदल करून सुधारित मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार संत गाडगेबाबा अभियान व स्वच्छ भारत अभियान यांच्या कामांची सांगड घालून ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी

व्यापक स्वरूपात करणार जनजागृती
ग्रामीण भागात शौचालयांचा शाश्वत वापर होण्याच्या दृष्टीने या अभियानात व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सांडपाणी व घनकचऱ्याची सुरू असलेली कामे पूर्ण करून अधिक गाव हागणदारीमुक्त, स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काम करण्यात येत आहे. - डॉ. वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग

बातम्या आणखी आहेत...