आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थगिती:15 स्मार्ट पार्किंग स्लाॅट सुरू हाेणार ; ​​​​​​​आयुक्तांच्या दालनात आज हाेणार बैठक

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गतच शहरातील वाहतूक काेंडी दूर करून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहरातील ३३ ठिकाणी स्मार्ट पार्किंग स्लाॅट सुरू करण्याच्या प्रक्रियेला काेराेनामुळे स्थगिती देण्यात आलेली असतानाच या विषयावर ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केले हाेते. प्रशासनाने संबंधित ट्रायजेन कंपनीशी चर्चा करून तातडीने १५ ठिकाणी पार्किंग स्लाॅट सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात, येत्या मंगळवारी (दि. २२) मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत ट्रायजेन कंपनी व स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांची बैठक हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...