आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतनवाढीचा करार:सीएटमध्ये 15  हजार रुपये वेतनवाढ

सातपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर औद्योगिक वसाहतीतील टायर निर्मिती करणाऱ्या सीएट कंपनीतील कामगारांना कुठल्याही प्रकारे उत्पादन वाढ न करता १५ हजार १०० रुपये अशा भरघोस वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे. याचबरोबर कंत्राटी बेस १३ एमएसपी कामगारांना कायम करण्यात आले. टायर उद्योगात उत्पादन व मागणी यात प्रतिकूल परिस्थिती असताना आणि उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू नसताना कंपनी व्यवस्थापन व सीटू प्रणीत मुंबई श्रमिक संघ कामगार युनियन यांच्यात १२ वेळा सकारात्मक चर्चा झाली. १ नोव्हेंबर २०२२ ते ३० एप्रिल २०२६ पर्यत ४२ महिन्यांकरता वेतनवाढ करार झाला आहे.

या कराराने पहिल्या २८ महिन्यात दहा हजार तीनशे वेतनवाढ व त्यानंतर पूर्ण १५ हजार १०० वेतनवाढ मिळणार आहे. याचबरोबर कामगारांचा २० लाख रुपये टर्म इन्शुरन्स, कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास कुटुंबातील व्यक्तीला २० लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.

पगारी रजेत वाढ करण्यात आली असून मागील करारातील सर्व सुविधा चालू राहणार आहे. व्यवस्थापनाच्या वतीने एचआर हेड मिलिंद आपटे, व्हीपी जयशंकर, प्लांटहेड श्रीनिवास पत्की, रोहित साठे, विनय जोशी, उदय कन्सारा, नोबी डिसिल्व्हा, तर युनियनच्या वतीने डॉ. विवेक मोंटेरो, अध्यक्ष भिवाजी भावले, सरचिटणीस कैलास धात्रक, उपाध्यक्ष पोपट सावंत, विनय यादव, खजिनदार वाल्मीक भंडागे, सदस्य आद्यशंकर यादव, प्रमोद बेले, पृथ्वीराज देशमुख यांनी चर्चेत सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...