आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागृहकर्जाची नियमित परतफेड केल्यानंतरही गृहकर्ज देताना ठरलेल्या व्याजाच्या व्यतिरिक्त अधिक व्याज आकारत आणखी कर्जफेड करण्यास तगादा लावत सदनिकेचे मूळ दस्त न देणाऱ्या एका खासगी बँकेला ग्राहक न्यायालयाने १५ हजारांचा दंड आणि कर्जमुक्त असल्याचा दाखला व मूळ दस्त देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले. याबाबत तक्रारदार विजय चाळीसगावकर (रा. जेलरोड) यांनी ग्राहक न्यायालयात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी २००९ मध्ये एका खासगी बँकेकडून ५ लाख ५० हजाराचे गृहकर्ज घेतले होते.
१२ वर्षे म्हणजे १४४ हप्ते फेडायचे होते. तक्रारदार यांनी कर्ज नियमित फेडले. मात्र संबंधित बँकेत २०२१ मध्ये चौकशी केली असता बँकेच्या गृहकर्ज विभागाने १४४ एवजी १८२ महिने कर्जफेड करायची असल्याचे सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एेकून घेतला. बँकेकडून तक्रारदार हे थकीत कर्जदार असल्याचे सांगत बचाव करण्यात आला.
तक्रारदारांच्या वकिलांनी या आधीच्या निकालांचे दाखले देत तक्रार योग्य असल्याचे सांगितले. ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे, सचिन शिंपी यांनी बँकेने तक्रारदाराला कर्ज नील असल्याचा दाखला व आणि सदनिकेचे मूळ डिड्स द्यावे तसेच शारीरिक मानसिक त्रासापोटी १५ हजार रुपये द्यावे, असे आदेश दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.