आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन रेडक्रॉसकडून महिला दिनानिमित्त आयाेजित फिजिओथेरपी व बॉडी कॉम्पोझिशन शिबिराचा लाभ ७० महिलांनी घेतला. याशिवाय सुदृढ बालक स्पर्धेत १५५ बालक सहभागी झाले. सुदृढ बालक स्पर्धेत १ वर्षाखालील गटात हर्षित शिंदे, १ वर्ष ते ३ वर्षे गटात शिवन्या जाधव आणि ३ वर्षे ते ६ वर्षे वयाेगटात तक्षील पाटील हे प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे विजेते ठरले त्यांना मातांसह गौरवण्यात आले.
लहानपणी पालकांनी घेतलेल्या अतिरिक्त परिश्रमामुळे मुले सशक्त व निरोगी बनतात. भविष्यात ही मुले जबाबदार नागरिक या नात्याने देशाचेही नाव सर्वदूर पोहोचवतात. या प्रवासात महिलांचे योगदान अधिक असल्याने त्यांनी इतरांबरोबर स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्य गुप्तवार्ता नाशिक विभागाच्या उपायुक्त गीता चव्हाण यांनी केले. इंडियन रेडक्राॅस सोसायटी, सुयोग चाइल्ड अँड चेस्ट केअर, आणि मविप्रचे डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला गौरव आणि आरोग्य शिबिराचे आयाेजनदेखील करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.