आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धेचे आयाेजन:राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत 155 विद्यार्थी

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

योगा फाउंडेशन संचालित महाराष्ट्र योगशिक्षक संघ आयोजित व आदियोग महाविद्यालयाच्या सौजन्याने महायोगोत्सव नाशिक २०२२ निमित्त राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विविध वयोगटानुसार १० गट तयार करण्यात आले होते. सर्व १० गट मिळून राज्यभरातून एकूण १५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ याप्रमाणे पारितोषिक नाशिक योग संमेलनात दिले जाईल.

योगाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये योगाची आवड निर्माण करण्यासाठी ही राज्यस्तरीय ऑनलाइन योगासन स्पर्धा आयोजित केली आहे. चिन्मय आश्रम, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी, नाशिक येथे याचे उद‌्घाटन झाले. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून आदीयोग महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय गवळी, निसर्गयोगी योग केंद्राचे संस्थापक संचालक प्रा. पिराजी नरवाडे, योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष, डॉ. मनोज निलपवार आदी उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...