आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन दक्ष:एकाच दिवशी कोरोनाचे 16 नवे रुग्ण; नाशकात मास्क सक्तीचा महापालिकेचा विचार

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 13 जून रोजी एकाच दिवशी कोरोनाचे 16 नवे बाधित रुग्ण आठवल्यामुळे महापालिका खडबडून जागी झाली असून मार्च महिन्यांनंतर तब्बल एकाच दिवशी 16 रुग्ण आढळल्याची पहिलीच वेळ असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती करण्याचा विचार सुरू झाला आहे. अर्थात राज्य शासन नेमक्या काय सूचना देते हे देखील तपासले जाणार असून तूर्तास नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.

6 एप्रिल 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आत्तापर्यंत या महामारीच्या जवळपास तीन लाटांचा नाशिकला फटका बसला. पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या तुलनेततिसरी लाट तुलनेने सौम्य ठरली होती. त्यानंतर कोरोना जणू काही नष्ट झाल्यात होता. एप्रिल आणि मे महिन्यात असे अनेक दिवस होते की ज्या वेळेस एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र जून सुरूवात होताच कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिकेने ॲक्शन मोडवर येत पालकमंत्र्यांच्या निर्देशांनुसार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिवसाला किमान संशयित 500 रुग्णांच्या चाचण्या केल्या जाणार आहे. दुसरीकडे नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा डोस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. त्याबरोबरच आता बाजारपेठ सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्याच्या दृष्टीकोनातून मास्क सक्ती करता येईल का या दृष्टीने चाचपणी केली जात आहे.

13 दिवसांत 106 रुग्ण ; बाधितांनाच लक्षणे

जून महिन्यातील पहिल्या तेरा दिवसात तब्बल 106 रुग्ण आढळले आहेत. शहरात सद्यस्थितीत 76 कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण उपचार घेत असून हे सर्व रुग्ण गृह विलगीकरणातच आहेत. 76 पैकी 13 रुग्णांनाच कोरोनाची स्पष्ट लक्षणं असल्यामुळे तूर्तास घाबरण्याचे कारण नाही मात्र कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांना शिस्त लावण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग होणार

बुधवार(दि.15)पासून महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा सुरू होणार असून प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग करण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला दिल्या आहे. त ताप, सर्दी सारखी कोरोनाची लक्षणं आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाशी संपर्क साधून विद्यार्थ्यास घरी पाठवावे, अशा सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...