आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस प्रशासनाकडून जाहीर:16 ठिकाणे नो ड्रोन फ्लाय झाेन; ड्राेन उडविण्यासाठी परवानगी अनिवार्य

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लष्करी परिसरात अनधिकृत ड्रोन उडवण्याचे दोन प्रकार घडल्यानंतर पोलिस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेत शहरातील १६ ठिकाणे नो ड्रोन फ्लाय झोन म्हणून घोषित केले आहेत. ड्रोन उडवण्याच्या या घटनांमुळे आता कुठल्याही कार्यक्रमात ड्रोन उडवण्यासाठी पोलिसांची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे.

आयुक्तालयाच्या हद्दीतील लष्कराच्या प्रतिबंधीत ठिकाणी ड्रोन उडवण्याच्या दोन घटना घडल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाेलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षितता, महत्त्वाची धार्मिकस्थळे, लष्करी परिसर आणि संवदेनशील ठिकाणे यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही १६ संवेदनशील ठिकाणे ‘नो ड्रोन फ्लाय झाेन’ म्हणून घोषित केली आहेत.

ड्रोन आॅपरेटरसाठी परवनागी अनिवार्य : ड्रोनमालक, आॅपरेटर यांना कुठल्याही कार्यक्रमासाठी ड्रोनद्वारे चित्रीकरण करायचे असल्यास पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी अनिवार्य राहील. संबंधित पोलिस ठाण्यात ड्रोन तपासणीसाठी द्यावा लागेल. पोलिसांच्या देखरेखीखाली चित्रीकरण करावे. चित्रीकरण झाल्यानंतर ड्रोन पुन्हा पोलिस ठाण्यात जमा करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...