आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शनपर शिबिर:इनरव्हीलतर्फे शाळांना १६० स्टील टेबल टॉप

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इनरव्हील क्लबने सावरकरनगर येथील रचना ट्रस्टच्या मुलींच्या शाळेसह धोंडेगाव येथील आश्रम शाळेला १६० स्टील टेबल टॉप भेट दिले. मुलांना जेवायला आणि अभ्यास करता यावा म्हणून ही शैक्षणिक गरज ओळखून इनरव्हीलने भेट दिली. मुलींसाठी मासिकपाळी समज गैरसमज या विषयावर डॉ. सुप्रिया मालसाने, स्त्रीरोग तज्ज्ञ अपर्णा उपाध्ये यांचे मार्गदर्शनपर शिबिर झाले.

मुलींनी यावेळी मासिकपाळी दरम्यानच्या आपल्या अडचणींचे निरसन करून घेतले. इनरव्हील क्लबने मुलींना केळी आणि राजगिरा लाडूंचे वाटप केले. स्टील टेबल टॉप, अंबडच्या इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन्सच्या संचालिका व क्लबच्या सदस्या मृणाल उत्कर्ष संगई यांनी भेट दिल्या. त्या क्लबच्या उपाध्यक्ष अनिता भसे यांच्या कन्या आहेत. रचना ट्रस्टचे डॉ. हेमंत कोतवाल यांनी प्रास्तविक केले. क्लबच्या अध्यक्षा धारा मालुंजकर यांनी मार्गदर्शन केले. क्लबच्या सदस्या ज्योत्स्ना पवार, स्मिता जोशी, कल्पना माळोदे, यमू अवकाळे यांची उपस्थिती होती. नामदेव पोखरकर, अतुल संगमनेरकर, पुष्पा जोशी, अध्यक्षा डॉ. शोभा नेर्लेकर आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

बातम्या आणखी आहेत...