आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस अकादमीत कोरोनाचा शिरकाव:नाशिक येथील पोलिस अकादमीतील 167 प्रशिक्षणार्थी निरीक्षकांना कोरोनाची लागण

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एम.पी.ए मध्ये 775 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत

नाशिक येथील महाराष्ट्र पाेलिस अकादमी(एमपीए) मध्ये कोराेनाने शिरकाव केला आहे. नव्या 167 प्रशिक्षणार्थी पाेलिस उपनिरीक्षकांना कोरोना ची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे.

एम.पी.ए मध्ये 775 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यात गोवा राज्यातील 12 प्रशिक्षणार्थींचाही समावेश आहे. एम.पी.ए.मध्ये नुकतीच महानगर पालिकेच्या वैद्यकीय पथकाच्या वतीने कोरोना टेस्ट करण्यात आली. यात 167 प्रशिक्षणार्थीचे कोरोना अहवाल बाधित असल्याचे निदर्शनास आले.

बाधित प्रशिक्षणार्थींवर महापालिकेच्या ठक्करमध्ये आणि एका खासगी दवाखान्यात तसेच मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. यातील सर्वच प्रशिक्षणार्थींची प्रकृती उत्तम असून त्यांना विलगीकरण करून उपचार सुरू करण्यात आले असण्याची माहिती मनपा आरोग्य विभागाचेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र भंडारी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...